दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली असे कागदावर खोटे दाखवुन श्री .ढगे वनपाल व श्री .गिते वनरक्षक ह्या दोघांनी प्रचंड प्रमाणात शासनाच्या पैशाची लुट केली आहे .त्यांनी कागदावर दाखविल्याप्रमाणे वृक्ष लागवडीचा मागमुसही त्या रोडवर नाही .काही रोपे पेठवडज – मुखेड रोडवर विना लावता फेकुन दिल्याच्या फोटो मी त्यांना पाठवुन कामात कुचराई होत असल्याचे निदर्शनास आणुन दिले होते आणि वरिष्ठाना भ्रमणध्वनीव्दारे सुचना केली होती.पण सदर कमेॕचा-याना वरिष्ठ वनक्षेत्र अधिका-याचा वरद हस्त असल्यामुळे ते गेंड्याची कातडी पांघरूण दिवसाढवळ्या जनतेच्या करोडो रुपयाची उधळपट्टी खुलेआम करत आहेत .बोगस खताच्या पावत्या सादर करुन कुठल्याही झाडांना खत न घालता पैसे हडप करण्याचा गोरखधंदा खुलेआम सुरु आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालुन सर्व कामाची एसआयटी माफॕत चौकशी करुन सदरील कमेॕचा-यावर योग्य ती कायॕवाही करावी अन्यथा यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा श्री .भालचंद्र नाईक शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख नांदेड यांनी दिला आहे


