दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :-कंधार तालुक्यातील फुलवल सर्कल मधील भाजपा बूथ संवाद दौऱ्याच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री .प्रतापराव पा.चिखलीकर साहेब व सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा यांच्या उपस्थितीत मंगनाळी या गावा मध्ये मा पंचायत समिती सदस्य श्री .गोविंद शिंदे सर यांनी मंगनाळी या गावा मध्ये मोठ्या उत्साहात फटाके बाजी करून स्वागत करण्यात आले.शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुखांच्या घरी जाऊन भेटी-गाठी देऊन संवाद साधण्यात आला.तसेच कळका येथे श्री राजीव पाटील गायकवाड उपसरपंच प्रतिनिधी कळका यांनी जेसीबी मशीन च्या शाह्याने मोठा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला सुवासिनी बाईलेकीनी कुमकुम तिलक लावून पंचारती ओवाळून आदरसत्कार करण्यात आला.यावेळी श्री .बाबुराव केंद्रे साहेब,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री श्याम तेलंग ,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.चित्राताई गोरे,भाजपा तालुकाध्यक्ष श्री भगवानराव राठोड, श्री.साईनाथ अप्पा कोळगीरे भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष,श्री मधुकर डांगे, श्री राजहंस शहापुरे, श्री बालाजी तोटावाड,मा उपसभापती श्री पंजाबराव पाटील वडजे, श्री गिरिधारी केंद्रे, श्री.राजीव पाटील गायकवाड उपसरपंच प्रतिनिधी कळका,श्री दत्ता चंदनफुले,मा सरपंच श्री केरबा पाटील वडजे, श्री केशव पाटील वडगावे, सरचिटणीस श्री.व्यंकट पाटील कळकेकर,युवा मोर्चा कंधार तालुका उपाध्यक्ष श्री.बालाजी पाटील वडजे, श्री.पांडुरंग पा शिंदे, श्री वि जी कदम सर, श्री गजानन पा पवळे,युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष श्री माधव पा जाधव, सरपंच श्री .भुजंग देव्हारे , श्री.रजत शहापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी,पत्रकार बांधव बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख उपस्थितीत होते.


