
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या जि,प,सावळी -ईचोरा सर्कलमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळांच्या विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शहीद पत्नी कुन्तीताई आडे यांच्या कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी कुंतीताई आडे यांनी आपल्या मनोगत सध्याच्या परिस्थितीत सावळी सदोबा परीसरामध्ये शिक्षण क्षेत्रात भरपूर विद्यार्थी उंच भरारी घेत आहे,त्यामुळे सावळी सदोबा परिसराचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असे प्रतिपादन शहीद विरपत्नी कुन्तीताई आडे यांनी ईचोरा व इतर शाळेनां भेटी देऊन विद्यार्थाचे मनोबल वाढले,जि,पं, उच्च प्राथमिक मराठी ईचोरा येथील कु, वैष्णवी कुंडलिक पवार यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला,
दातोडी येथील जि पं उच्च प्राथमिक मराठी शाळांच्या विद्यार्थी चि, सुशांत प्रदिप इंगळे व धरती विष्णू नेवारे विद्यालयात एक विद्यार्थिनी सुष्टी खोंडे या तिघांचे शाळेत जाऊन त्यांचे सत्कार करण्यात आला.
पांडुरंग मोरे विद्यालय उमरी कापेश्वर येथील विद्यार्थीनींनी कु. अमृता वानखेडे यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला.खडका येथील विद्यार्थिनी कु.सानिया अडंकुलवार यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला.
जि,पं, उच्च प्राथमिक मराठी शाळा आयता येथील विद्यार्थिनी कु, पूर्वी मडावी कु, पूर्वी खडसे श्रीकांत मुंढे यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला , या सर्व विद्यार्थ्यांचे
शाहिद विरपत्नी कुन्तीताई ज्ञानेश्वर आडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे यावेळी श्री बाळासाहेब शिंदे (संरपच) सावळी सदोबा धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप माजी जि पं उपाध्यक्ष श्री मुबारक भाऊ तंवर माजी पंचायत समिती सभापती विजय राऊत कुषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती नुनेश्वर भाऊ आडे राजु भाऊ चव्हाण किसान चव्हाण, मधुकर राठोड, रमेश राठोड सुभाष नगर आणि ईचोरा,दतोडी उमरी (कापेश्वर) आयता येथील सर्व संरपच उपसरपंच जेष्ठ नागरिक उपस्थित होते,