
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- जानकी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या यानाती निमित्त संथेचे अध्यक्षप्रदीप खोमणे सर यांनी मनोगत व्यक्त केले हे थोर समाजसुधारक होते .त्यांच्या मुळे शिक्षण क्षेत्रात अमूल्य असा बदल घडून आला .स्वराज्यासाठी शिवबाला घडविले, तुझे आभार किती माणू माउली ,शिवबाची जननी तू झालीस ,साऱ्या मावळ्याची सावली .आपल्यामध्ये अनंत दोष असूनही ,आपण स्वतः वर प्रेम करतो ,तर काही द्वेषासाठी आपण इतरांचा द्वेष कसा करू शकतो तसेच आजचा दिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो असे संथेचे अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे सर यांनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमास अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे, संस्थेचे उपाध्यक्ष शीतल प्रदीप खोमणे , ,अजय स्वामी, सुवर्णा गोरे, विद्यासागर धूळगुंडे ,सुचिता हारे, गोपाळ मेहत्रे ,सलीम पठाण ,उद्धव बेंबडे, गायकवाड उमादेवी व इतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.