
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक सुरक्षितता पंधरवाडा अभियानाला ११ जानेवारी पासून सुरुवात झाली आहे.एस-टीचा प्रवास हा सुखकर व अत्यंत महत्वाचा मानला जातो.राज्य परीवहन बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडुन नियमीतपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येत आहेत.दरवर्षी जानेवारी महिन्यात राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते.या अभियानाअंतर्गत महामंडळाच्या राज्य भरातील सर्व आगारांमध्ये चालकांचे व यांत्रिक कर्मचारी यांचे प्रबोधन करण्यात येते.
परिवहन विभाग,पोलिस विभाग व इतर सामाजिक संस्थाचे प्रतिनीधी यांच्यामार्फत
रा.प.महामंडळातील चालकांना अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करण्यात येते.हे अभियान ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान सुरक्षित अभियान म्हणून चालणार असून जव्हार बसस्थानकात सुद्धा ११ जानेवारी पासून या सुरक्षितता अभियानाची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रमूख पाहुणे जव्हार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नवले यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रबोधन केले.यावेळी लेखाधिकारी स्वप्निल राऊत,आगार व्यवस्थापक राजेश दांडेकर,लेखाकर डी.एम बनसोडे,वाहतूक नियंत्रक कुमार भोये,सदाशिव राथड,वाहक हरिश्चंद्र भोये,पारस सहाणे तसेच एस टी कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.