
दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी- मयुरी वाघमारे.
===================
राजगुरूनगर :- दिनांक 13 जानेवारी 2023. खेड तालुक्यातील रस्त्यानसाठी खासदार डॉ. अमोल दादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून रेटवडी ते खरपूडी या रस्त्यासाठी 3.54 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याबद्दल रेटवडी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. अमोल दादा कोल्हे साहेब यांचे मनापासून आभार मान्यात आले आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्तयांच्या कामाला अखेर आता सुरवात होणार आहे. पावसामुळे रस्त्यानची झालेल्या दुरावस्थे मुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत होता रस्त्यांवरील खड्ड्यान मुळे अपघात ही होत होते. अनेक दिवसांन पासून या भागातील नागरिक, ग्रामस्थ रस्ता बांधणीची मागणी करत होते.
खासदार डॉ. अमोल दादा कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधान मंत्री ग्राम सडक योजने आंतर्गत खेड तालुक्यातील 3 रस्त्यांसाठी तब्बल 14.76 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये 1) काळुस ते सांगामवाडी आंतर 4.55 कि. मी रक्कम 3.29 कोटी रुपये निधी
2)MDR- 19 खरपूडी बुद्रुक ते रेटवडी, वाकळवाडी, वरुडे अंतर 4.04 कि. मी. रक्कम 3.54कोटी रुपये निधी
3)MDR-16 हेड्रुज बचेवाडी, कडलगवाडी, वाशेरे, कोहिंडे बुद्रुक रस्ता अंतर 9.15 कि. मी निधी 7.93 कोटी रुपये.
असा एकूण 14. 76 कोटींचा निधी शासनाकडून खेड तालुक्यातील रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्या मुळे या गावातील ग्रामस्थांनी खासदार साहेबांचे आभार व्यक्त केले आहेत.