
दैनिक चालु वार्ता मुक्ताईनगर-
कुऱ्हा: कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुऱ्हा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘सिंहनाद’ वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. हेमराज मेतकर यांनी केले. त्यांनी त्यात सांगितले की स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण विश्वाला विचारांनी मंत्रमुग्ध केले, विश्व बंधुत्वाची शिकवण दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार, सुभाषित, कथा सादर केल्या. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक कु.पूर्वा गोसावी ,द्वितीय पारितोषित सानिया मिर्झा ,तृतीय पारितोषिक कोमल धानुका तर प्रोत्सहानपर पुरस्कार कु.पल्लवी पाटील,पल्लवी महाजन यांना मिळाले. त्यानंतर प्रा.भाग्यश्री ढगे व प्रा.अतुल तेली यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य.सचिन जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सदर मनोगतात त्यांनी सांगितले प्रत्येक विद्यार्थी हा चांगला श्रोता असला पाहिजे श्रवणातून आणि वाचनातून आपण आपली प्रगती साधू शकतो. त्यांनी यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या पत्राचा संदर्भ देत म्हटले की भारताला समजून घ्यायचं असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा, त्यात सर्व सकारात्मक आहे; नकारात्मक काही नाही.
विवेकानंदांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक युवकांनी बलवान बनले पाहिजे, एकाग्रता, मनाची शुद्धता आणि आत्मविश्वास ही त्रिसूत्री तरुणांनी अंगिकारावी. यावेळी विवेकानंदांच्या जीवनातील माकडाचा प्रसंग सांगत *संकटांपासून दूर पळाल तर संकट वाढत जातील, संकटांना तोंड द्या* असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून प्रा.योगेश नेटके सर लाभले होते.सदर कार्यक्रमाला महाविद्यायचे प्राचार्य,प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंजली बावस्कर व कु.कोमल धानुका हिने तर आभार प्रदर्शन प्रा. शितल म्हस्के यांनी केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली