
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
परभणी:- प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा वेळी पोलिस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र संस्थापक सचिव शेषराव सोपणे यांना युट्यूब चॅनल पत्रकारीता व शिवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा व प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा आदी सामाजिक उपक्रम संपन्न झाले.यावेळी -भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब महाराज मोहिते पाटील, माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे,युगंधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव अडागळे, विमलताई पांडे,पुनम ताई,मारवा सुरेखा लखमले, कल्पना धावडकर, रुक्मीनबाई जाधव इत्यादी उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रभावती नगरी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी केले, आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.