
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा येथील गोविंदराज मंगल कार्यालय येथे घेण्यात आले
फार्मर कप २०२२ स्पर्धा पूर्ण होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. ३१ जानेवारी हा स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. मे २०२२ मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली आणि ९ महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एकीची ताकद अनुभवली. सोबतचं उत्पादकता वाढवणे, खर्चाची बचत करणे असं बरचं काही शिकले. पानी फाऊंडेशनने सध्या “माझा कप, माझी शिकवण” नावाने एका प्रशिक्षणाचे आयोजन केले होते तिथं आपले ज्ञान आणि अनुभवांविषयी चर्चा करण्यासाठी तालुकास्तरावरील प्रमुख शेतकरी भेटत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या गटाला यशाकडे नेण्यासाठी नेतृत्वाची प्रमुख भूमिका बजावली होती असे शेतकरी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
यामध्ये डिजिटल शेती शाळा, शेतमाल विक्री, इर्जिक अशा वेगवेगळ्या अनुभवांवर चर्चा केली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजक शेतकरी एकमेकांना भेटून संवाद साधतील असे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे .
आजच्या या प्रशिक्षणाला मराठवाडा विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे हे उपस्थित होते त्यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक करून फार्मर कप स्पर्धा 2022 मध्ये ज्या जिद्दीने आणि जोमाने गटांनी सहभाग घेतला, गटशेतीमध्ये खूप चांगले काम करून दाखवले, सर्वांच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली व खर्चात बचत झाली यासाठी सर्वांचे अभिनंदन केले,
नंतर प्रशिक्षक टीमची ओळख करून दिली.श्री विनोद ठोंबरे,महेश लाखे, अनिल राठोड यांनी खूप सोप्या भाषेत आणि हसत खेळत शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
यावेळी सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर या वडेपुरी येथील शेतकरी गटातील सदस्य असून यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांना यावर्षीच्या व पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, भास्कर पाटील पवार , भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सर्व शेतकऱ्यांचे पाणी फाउंडेशन च्या वतीने लोहा तालुका समन्वयक राजाभाऊ कदम व सिद्धार्थ कवडे यांनी आभार मानले.