
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:जिजाऊ जन्मोत्सव निमित्त दिनांक 14 जानेवारी 2023 , शनिवारी जिजाऊ चौक देगलुर येथुन भव्य शोभा यात्रेची सुरूवात डॉ . सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गाऊन झाली , ……..महिला सशक्ती करणासाठी शोभा यात्रेतुन माँ जिजाऊ यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य , त्याग , संघर्ष घरोघरी पोहचला पाहीजे यासाठी सर्व समाज बांधव , संघटना , राजकीय पदाधिकारी , अधिकारी , युवा , तरुण, तरुणी , विद्यार्थी , डॉक्टर्स , वकील ,उद्योजक , व्यापारी , शेतकरी , शिक्षक व ईतर घटकातील नागरिकांनी सहभाग नोंदविला . ढोल ताशा , झेंडे , कलश धारी भगिनी , जिजाऊ रथ , जिजाऊ सह महा मानवाची वेश भुषाधारी , लेझीम पथक , मावळे भुमिकाधारी , घोड स्वार , भजनी मंडळ , वारकरी , उर्दू शाळा चे विद्यार्थी , शिक्षक यांचे सर्व धर्म समभाव संदेश , समाज उपयोगी संदेश फलक , विविध विषया वर पथ नाट्य , सर्व धर्म , समाज , संस्कृती , संप्रदाय यांचे देखावे , विविध क्रुती युक्त विविध सांस्क्रुतिक प्रदर्शन या शोभा यात्रेत आकर्षण करणारे दिसुन आले . या यात्रेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर , आमदार जितेश अंतापुरकर , व्यंकटराव पाटील गोजेगाव कर , शिवाजीराव देसाई , अशोक देसाई , प्रितम देशमुख , अँड .अंकुश देसाई , अनिकेत पाटील राजूरकर , नागनाथ वाडेकर , महेश पाटील , संकेत पाटील , अरुणा ताई जाधव ,रमेश जाधव , कैलास येसगे यांच्या सह मोठय़ा संख्येने सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांची , सामाजिक कार्यकर्त्याची व मोठ्या संख्येने सर्व समाज बांधवांची व महिलांची उपस्थिती होती …… मार्गातील आन्ना भाऊ साठे , डॉ.बाबा साहेब आंबेडकर , कप्तान अब्दुल हमीद , महात्मा गांधी , महात्मा बसवेश्वर, संत गाडगे बाबा , छत्रपती शिवाजी महाराज व शेवटी माँ जिजाऊ स्मारकाला जन्मोत्सव समिती नी वंदन करून पुष्प हार घालुन त्यांचा जयघोष केला ……. जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष संजीवनी ताई सुर्यवंशी , उपाध्यक्ष चैतन्या ताई वानखेडे , सचिव रंजना ताई मानुरे , कार्याध्यक्ष शिलाताई देसाई , मार्गदर्शक पुष्पाताई जाधव , संघटक दिपाली ताई पाटील , संगीता ताई कदम , सुशीला गाढवे , डॉ सुनील जाधव, नामदेव थड्के , , दिगंबर कौरवार , बालाजी जाधव , अँड. अंकुश राजे जाधव , जेजेराव शिंदे ,गजानन पाटील , बालाजी थड्के, ईश्वर देशमुख , देविदास थड्के , नारायण वड्जे , राहुल देसाई , बालाजी पाटील कुशावाडी कर , बजरंग कोसम्बे , विशाल पवार , आदि जिजाऊ जन्मोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी ही शोभा यात्रा आयोजित करून संपन्न केली . या मधे सर्व समाज बांधव , नगर पालिका , पोलीस प्रशासन चांगले सहकार्य केले .