दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील जवळा येथे श्रीगुरुदेव विद्यामंदीर शाळेत आयोजित केलेल्या 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नारायणलीला इंग्लिश मिडीयम स्कूल आर्णी चे विद्यार्थी निर्मल विनोद लोहट इयत्ता 9 वी याने हायस्कूल गटात पवन उर्जेवर आधारीत मॉडल सादर केला होता तसेच मयुर रविंद्र गावंडे इयत्ता 5 वी याने प्राथमिक गटात मळणी यंत्र तयार करुन सादर केला होता.सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्राथमिक गटातुन मयुर रविंद्र गावंडे याने द्वितीय क्रमांक पटकवला आणि त्याला आयोजकांतर्फे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवुन त्याचा सत्कार करण्यात आला.
मयुर ने या यशाचे श्रेय अपले पालक तसेच मार्गदर्शक शिक्षकांना दिले. विज्ञान विषयाचे शिक्षक सैयद आबिद सर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्याने हे यश प्राप्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ठाकरे मॅडम आणि सर्व शिक्षक तथा शिक्षिकांनी या विद्यार्थ्याचे शाळेत सत्कार केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद जी बूब सर यांनी या यशाची दखल घेत मयुर आणि शिक्षक वर्गाचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले…


