दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथे दिनांक २५ जानेवारी २०२३ रोज बुधवारी श्री.गणेश जयंती निमित्त सिध्दीविनायक गणेश मंदिर पेठवडज येथे सकाळी ७ वाजता अभिषेक केला जाणार आहे.त्यानंतर १० ते १ भागवताचार्य ह.भ.प.लक्ष्मीदिदी पांचाळ आळंदीकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.तसेच किर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तेव्हा पंचक्रोशीतील पेठवडज,सिरसी बु,सिरसी खुर्द,गोणार,मंगनाळी,कळका, वरवंट ,राहटी ,देवईचीवाडी,चुडाजीचीवाडी येथील सर्व गणेशभक्तांनी वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पंचक्रोशी पेठवडज यांनी केले आहे.स्थळ :- श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर पेठवडज आयोजक समस्त गावकरी मंडळी पेठवडज पंचक्रोशी


