
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
जागतीकरणाचा आजचा जमाना कितीही डीजीटल झाला तरी. ग्रामीण भागातील लहान पणाच्या आठवणी आजही ताज्या तवण्या वाटतात.खरच ते लहान पणीच जीवन आता ईतक सुंदर वाटतंय की,आपण आता लहानच व्हावं, आणी सर्व काही अनुभवावा.परंतू गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.आशीच एक लहान पणीची आठवण आजही घडी घडीला आठवण करून देणारे माझ्या आयुष्याततील “जात्यावरच दळण “हे मात्र आजही आठणीतून जात नाही.
जिल्ह्यातील अखेरच्या टोकाला आमचे छोटेसे गुंटूर हे गाव आहे.याच गावात आमचे घर आहे.घर म्हणजे लई मोठे नाही हो,खपरेलांचे घर.आमच्या आज्यानी बांधले होते.आमच्या आळीत आमच्याकडे माडीचे घर होते. माडीवर जाण्यासाठी लाकडाच्या पायऱ्या होत्या. आणी मस्त बसण्यासाठी बंगई होती.माझे आजोबा माध नाईक म्हणून सर्व परिचीत होते.पटका बांधून माझे आजोबा मला खांद्यावर बसून गावात फिरून आणत असत.आणी मी मस्त बसून राहायचो.
साधारण 1988 चे दिवस असावेत. आमच्या गावात सकाळी आणी हालटीन (संध्याकाळी) बस येत असल्याची त्यामुळे मी जर कोणी घरातील वेक्ती कुठे जात असेल तर मला बस स्थानकका पर्यंत घेऊन जात असायचे.मग मला वाटायचं की,आपण कवा या गाडीत बसायचे ? आमच्या गावात तर चार चार दिवस लाईट नसायची हो.त्यामुळे घरच्या दळणाची लई पंचाईत व्हयाची.आमच्या परिवारात आजी,आजोबा,आई,बाबा,आणी मला चार सखे चुलते आहेत.आणी आमच्या परिवारात मी सर्वात मोठा प्रथम मोठा.माझ्या आजोबांनी मला एक सुंदर गोष्ट अशी शीकवली की,जर कोणी तुला आवाज दिला तर तू ‘जी’ या शव्दानेच समोरच्या वेक्तीला बोलायचे.असे बजावून सांगितले होते.गावात लाईट आहे का ? आणी गावातली घिरणी चालू आहे का ?हे पाहण्यासाठी मला आई पाठवत असे.मी गावात जाऊन घिरणी पाहून घरी सांगत असे.घिरणीत ‘दळण’ होते.मात्र लाईटचा बे पत्ता होता.लाईट जरी नसली तरी आमच्या घरी दगडाच जात होतं. मग काय आमची आई जात्यावर ‘दळण ‘दळायची.दळण दळत असल्याचा आवाज येत असे.आणी मी आईकडे जात होतो.मग काय आईच्या मांडीवर मी डोके ठेऊन मस्त झोपी जात होतो.आईच्या अंगाई गीताने व दळणाच्या आवाजाने मला कधी झोप लागायची हे मला कळतच नसायचे.घरी जात्यावरच दळण थोडे दबर(मोठे मोठे)असायचे त्यामुळे भाकरीहि तशाच असायच्या.कधी कधी आमच्या गल्लीतील काही जण बाजूच्या गावात लाईन असल्याची माहीती मिळायची आणी काय मज्या बी कोक्यावर दळणाचं ओझं. एका पोत्यात ज्वारी,तर दुसऱ्या एका थयलीत थोडी गहू टाकून ती दोन चुंगडे घेऊन पाई पाई शेजारी असलेल्या होडाळा गावला जाऊन दळण आणायचो. तेंव्हा कुठ नरम गरम भाकरी चपाती भेटत असे.कधी कधी माझा दळणा नंबर लागलाकीच गप्प कण लाईट जात असे.मग काय मला तिथले लोक मनायचे तुझाच नंबर होता की,रे..आरे..आरे…? हे तर काहीच नाही. माझे दळण आर्धे दळले किच लाईट जायची.मला असा राग यायचा हे सगळं दळण फेकूनच द्यावे वाटायचे?पण काय करणार?तसच अर्धे दळून आणी अर्धे तसेच घेऊन पुन्हा पाई चालत घरी.
घरी गेलं की,आमची आई दळलेलं दळण तापासून पहात असे.मग काय , काय र बापू अजबी दळण दबरच अनलास की ?
मग मी रागाने मनायचो, आता मी नंतर दळनाला जाणार नाही ? मात्र दळणाची बारी माज्यावरच येत असे.पूर्वी दळणाला लोखंडी टोपले,जेर्मलचे टोपले,चुंगडे (पोटे)लाकडाचे मेनवलेले लाकडी टोपले असे साहीत्य असायची.मी अनेक वेळा लोखंडी टोपल्यात मी दळण आणायचो. दळलेलं टोपले डोक्यावर घेऊन गावातून येत असायचो.पण गावातील रस्ते खराब असल्यामुळे मी ठेस लागून दळण घेऊन पडायचो.मग काय ,पुन्हा सांडलेले दळण भरून घेऊन जात असायचो.असे अनेक वर्षानुवर्षे माझे आणी दळणाचे नाते आजपर्यंत टिकून आहे.मला वाटले मजी आई आता लगन झल्यावर तर मला दळण देणार नाही.असा काही नाही बर.दळण संपलकी आपल्याला आदेश येतोच.परंतु जस जस वय वाढत गेल.तसा तसा दळणाचे ओझं देखील वाढतच चालय.आज सगळीकडे डिजिटल जमाना झालाय.मोट्या मोट्या दळणाच्या घिरण्या आहेत.दळलेलं पीठ किराणा दुकानात भेऊ लागले आहे.परंतू ते दळलेलं दळण आजही डोळ्यासमोर येतय.आजही मी घरातील दळण मीच घेऊन येत असतो.गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी परंतू आईच्या मांडीवर डोक ठेऊन खऱ्या दळणाचा अनुभव मला मिळाला हेच माझे भाग्य.
आईनाथ सोनकांबळे, लोहा