
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथील शिवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नांदेड दक्षिण तालुका प्रमुख बाबुराव मोरे, युवा सेनेचे लोहा -कंधार विधानसभा प्रमुख बालाजी गाडेकर, शिवसेनेचे नांदेड दक्षीण तालुका संघटक शेषेराव पाटील दिघे, प्रा बाळासाहेब जाधव युवा सेनेचे बालाजी गाडेकर
सुरेश पा.घोरबांड, विठ्ठल कोठेवाड, पांडुरंग कोठेवाड, जिल्हाध्यक्ष -शुभम घोडके,शिवा संघटना तालुकाध्यक्ष -हाणुमंत लांडगे,कपिल पा.नवघरे, संजय पा.येवले, साधु पा.वडजे,सुर्यकांत आनेराव, राजकुमार पिल्लोळे, यांची प्रमुख उपस्थिती होती