
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका इरई
इरई, कवठाळा, भोयगाव,भारोसा, धानोरा, पिपरी येथील विध्यार्थी चंद्रपूर ला शिक्षणा घेण्याकरिता ये – जा करतात परंतु यांना वेडेवर या मार्गवर 1 च्या नंतर कुठली पण बस उपलब्ध नसल्याने विध्यार्थ्यांना शेवट ची 1 बस ही 5.30 ला होती त्या बस मंधी रोजाना 120 च्या वर पॅसेंजर राहत असून विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, येत्या 4 दिवसा पासून 5.30 ला सुटणारी बस कधीच वेळे वर सुटत नसून 1 तास 2 तास लेट सुटत होती, विध्यार्थी खूप त्रासून जात होते व काही नवीन बस सुरु करण्याची अत्यंत गरज होती विध्यार्थी बस सेवे मुळे खूप त्रस्त झालेले आणि शेवटी निखिल पिदूरकर यांना ही समस्या सांगितली.त्या नंतर निखिल पिदूरकर यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब ण करता सर्व विध्यार्थ्यांच्या वतीने आगार प्रमुख, विभागीय नियंत्रण यांचा कार्यलयात जाऊन समस्या सांगितल्या विध्यार्थी तसेच नागरिकांनी सहन केलेला त्रास सविस्तर सांगितलं व मागणीचे निवेदन देताचा कार्यलयातील अधिकाऱ्यांनी तात्काळ मागणी मान्य करून येत्या 27/01/2023 पासून सदर मार्गांवर नियमित वेळेवर बस सेवा उपलब्ध करून नवीन 4 वाजताची बस सेवा उपलब्ध करून दिली.