
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी :- मंठा येथील पत्रकारांची बैठक नुकतीच जेष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दर्पण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल बा.खंदारे यांची तर उपाध्यक्षपदी रविंद्र भावसार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात पुढील प्रमाणे संघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. सचीव मंजुषा काळे, सहसचिव सुरेश दवणे, कोषाध्यक्ष अतुल खरात,जेष्ठ पत्रकार बाबाकाका कुलकर्णी आणि प्रदीप देशमुख यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
जनहित आणि लोकभावना लक्षात घेऊन नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांनी नूतन कार्यकारिणीचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.