
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड दिनांक 24 प्रतिनिधी
अध्यक्ष: ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो. माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 24 जाने रोजी भव्य रक्तदान शिबिर व दंतरोग शिबिर चे आयोजन करण्यात आले.
वाढदिवसाचे अवचित साधून राजमाता जिजाऊ हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना टिफिन बॅग वाटप करण्यात आले याच दरम्यान वीरभद्र स्वामी मंदिरात महाआरती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय विद्यमान आमदार तुषार राठोड साहेब यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्पदंश तज्ञ तथा मराठवाडा भूषण डॉ. दिलीप पुंडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार , मराठवाडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कोठारी, उपाध्यक्ष दीपक पावडे, नांदेड जिल्हा अध्यक्ष शंतनू कोडगिरे, तालुका अध्यक्ष बाळानंद गबाळे, मुखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नरहरी फड, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष शंतनू कोडगिरे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी उद्घाटनपर भाषणात आमदार तुषार राठोड साहेब म्हणाले की केमिस्ट परिवाराने जगन्नाथ (आप्पा )शिंदे वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिर व दंतरोग शिबिर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून रुग्णांना रक्ताची नितांत गरज ओळखून अशाप्रकारे आपण सामाजिक बांधिलकी जपली आहे हा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. दिलीप पुंडे यांनी केमिस्टांनी रक्तदान शिबिर व दंत शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक कार्य केमिस्टांच्या संघटनेच्या माध्यमातून करावी ही इच्छा व्यक्त केली. सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कोरवार यांनी केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले व डॉक्टर आणि केमिस्ट हे एकमेकांशी परस्पर पूरक अशी नाती आहेत. व जिल्हाध्यक्ष शंतनू कोटगिरे म्हणाले की मुखेड ची केमिस्ट शक्ती हीच माझी खरी शक्ती आहे. यांच्यामुळे मी जिल्हा केमिस्ट संघटनेवर कार्यरत आहे. आणि केमिस्टांच्या अडी,अडचणी सोडवण्यासाठी मी केव्हाही तत्पर आहे यावेळी राजे छ. मिल्ट्री अकॅडमी चे संचालक. ज्ञानेश्वर पाटील डुमणे व त्यांचे सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी, तसेच राजमाता जिजाऊ हॉस्टेल चे सर्व विद्यार्थी संचालक बिरादार सर, उपस्थित होते. तसेच बाराहाळी,जांब, मुक्रमाबाद चांडोळा बेटमोगरा,पेठवडज, येवती, आदी सर्कलचे केमिस्ट या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य बालाजी अण्णा एकाळे, महेश देशमुख, शिवकुमार बिरादार, निखिल भाऊ काळे, राम पाटील, संजय बिडवई, गजू पत्की, बाळू सीतानगरे,
संतोष करेवाड,बजरंग देवकते र
व सर्व केमिस्टांनी विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.