
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- लोहा तालुक्यातील कलंबर खुर्द येथील समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती मुद्रीकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या आशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री मारोतीराव पाटील घोरबांड साहेब यांच्या शुभेच्छाने व मुख्याध्यापक श्री.एस.एन.मामडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने ,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नांदेड यांच्या परवानगीने संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर शाळेची नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांची शैक्षणिक सहल आनंदात संपन्न झाली.सहलीमध्ये ४२ मुले ४८ मुली ०६ शिक्षक ०२ शिक्षीका ०२ शिक्षकेतर कर्मचारी या सहलीत सहभागी झाले होते.१९ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील उदगीर, निलंगा,नळदुर्ग,पंढरपुर, प्रतापगड,राजगड,रायगड,देहू आळंदी,शिवनेरी,सिंहगड, आळेफाटा ,अहमदनगर, परळी वैजनाथ ,कंधार या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून नैसर्गिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांची विद्यार्थाना माहिती प्राप्त व्हावी यासाठी शाळेच्या वतीने सहलीचे आयोजन करण्यात आले होते.सहलीतून ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक,धार्मिक परिसराची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली सहलीमध्ये सहभागी प्रा.श्री.जी.के.शेट्टे सर, प्रा.श्री.ए. आर.वाघमारे सर, प्रा.श्री.व्ही.बी. मुंडे सर,श्री.व्ही.एस.जंगमे सर,श्री.ए.व्ही.घोरबांड सर,श्री. ए.डी. कदम सर,प्रा.श्रीमती गोरे मॅडम,सौ.सोळंके मॅडम,श्री.बालाजी घोरबांड ,श्री.सूर्यकांत तेलंग यांनी सहलीमध्ये भाग घेऊन सहलीचा आनंद घेतला.