
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती अंजनगाव सर्जी) :-आज दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुर्जी येथील परिसरात एक माकड गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले.मुक्या जनावर प्रेम करा असे आपण एकमेकांना नेहमी सांगतो.तथापि,आपण घरात पाळलेले प्राणी वगळता इतर प्राण्यांच्या सुख-दुःखाकडे आपले क्वचित लक्ष असते.विशेषतः भटकी जनावरे आपल्या दृष्टीने एक अडचणच असतात.त्यांचा बंदोबस्त होईल तर बरेच असे आपल्याला वाटते.
तथापि,अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे नागरिकांनी एका जखमी माकडाविषयी जी संवेदनशीलता दाखवली आहे ती सर्वांसाठी आदर्श ठरावी अशीच आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काळ्या तोंडाचे माकड गंभीर जखमी अवस्थेत आढळल्याने येथील परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद तर काही फोन उचलण्यास टाळाटाळ करतांना आढळले.तत्पूर्वी अंजनगाव सुर्जी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले प्राथमिक उपचार करून सौजन्यता दाखविली.तब्बल चार तासानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनेची माहिती घेत पशुवैद्यकीय रुग्णालयात पोहचले व त्यानंतर माकडाला पुढील उपचारासाठी परतवाडा येथे नेण्यात आले.