
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
लाखो रुपयांच घबाड बाहेर येणार…?
देगलूर -देगलूर शहरातील दोन प्रतिष्ठित कापड व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानात धाडी पडल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून G.S.T विक्रीकर विभागाची नजर चुकवून कर चुकविल्या प्रकरणी G.S.T विभागाने शहरातील दोन प्रतिष्टीत व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात आले आहे. अचानकपणे धाडसत्राची कारवाई झाल्याने शहरातील इतर कापड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे तसेच धाडीची माहिती मिळताच शहरातील काही कापड व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून पळ काढला आहे.
धाड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही विशेष म्हणजे भारत फॅन्सीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मालकापर्यंत कोणासही संपर्कसाधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा फोन नॉट रिचेबल
असा दाखवत आहे त्यामुळे धाड टाकणाऱ्या
अधिकाऱ्यांनी सर्वांचे मोबाईल जप्त केल्या आहेत
की काय ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तर शहरातील व्यापाऱ्यांना प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्यांनी अशी शासनाला अंधारात ठेऊन कर बुडवल्यास हा देश कसा प्रगती करणार ? हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे.
सायंकाळी ०७ वाजेपर्यंत अधिकारी चौकशी करीत होते तसेच चौकशी आणखी किती वेळ चालणार हे लवकरच स्पष्ट होईल .
चौकशीअंती सर्व काही स्पष्ट होईल पण, या धाडसस्त्रासहित भारत फॅन्सी मालकाने जमा केलेली बेहिशोबी मालमत्तेवर देखील कारवाई होणार का ? शहरात मोठमोठी टावरे, प्लॉटिंग या सर्व संपत्तीचे , हिशोब लागणार का ? अशी चर्चा शहरात रंगत आहे.