
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- मकर संक्रांतीनिमित्त घरोघरी महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन केले जाते. परंतू यामध्ये विधवा महिला नसाव्यात अशी प्रथा आहे .या जुन्या प्रथेला छेद देत शहरातील माजी नगरसेविका अनुराधा नळेगावकर यांनी सुहासिनी व विधवा महिलांना एकत्रित करीत मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रमाचे आयोजन केले. अहमदपूर शहरातील तळेगाव रोड येथील गीताई नगरमध्ये कार्यक्रम आयोजित या कार्यक्रमात संस्था चालक दर्शना हेंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विधवा महिलांच्या भावना ओळखून त्यांना अशा कार्यक्रमात सहभागी होता यावे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा या हेतूने माजी नगरसेविका नळेगावकर यांच्या संकल्पनेतून मागील पाच वर्षांपासून मकर संक्रातीला या कार्यक्रमाचे आयोजन महिलांच्या सामाजिक उन्नतीसाठी विधवा उपक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी आयोजित कार्यक्रमात सुहासिनी तसेच विधवा महिलांना एकत्रित वाण देऊन सन्मान करते वेळी प्राचार्य रेखा तरडे, डॉ. वर्षा माळी, सुनंदा कुलकर्णी, उषा सुडे, प्रणिता बेंबळे, शिल्पा हंगरगे, अंजली मुरुळे, साधना पाटील, बालिका हरणे, अयोध्या देशमुख, संगीता खटके, पल्लवी मस्के, आशा आवळे, सावित्रा मेडळलेवाड, शिवाबी मुरुळे, सविता पाटील, यांची उपस्थिती होती