
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
अजिंक्य प्रतिष्ठान आयोजित सम्राट अशोक नगर गणेश नगर एकता नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भीम जन्मोत्सव 2023 साठी मंगळवार(दि.07) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले असून हे कार्यक्रम व्यवस्थीत पार पाडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली . या भीम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप सोनवणे तर उपअध्यक्षपदी रोहित शेळके,आकाश धावारे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी आकाश भालेराव,सुदेश ओव्हाळ,कोषाध्यक्षपदी वैभव सौदागर ,मिरवणूक प्रमुख रोहित गायकवाड,मनोज बनसोडे , विजय जगताप यांची निवड करण्यात आली..
या वेळी राजाराम अण्णा वाघमारे,सुखदेव मस्के. भाऊसाहेब गांधले,इनकर साहेब,रमेश जगताप सर,अण्णा रणदिवेअलकेश वाघमारे,आप्पा सावंत,मच्छिंद्र हजारे, जावळे साहेब,जलील मोमीन, विकास राऊत,सर्जेराव भालेराव, कांबळे साहेब,मंगेश बनसोडे, भैया रणदिवे, बाळासाहेब यादव,रोहित पवार,रोहन खोचरे
,महेश वाघमारे,सागर भालेराव,रवी कुलकर्णी,राहुल सावंत,नितीन सावंत,अशोक कांबळे,शोयब काजीफारूख शेख,अभिषेक सौदागर आदी सदस्य उपस्थित होते.