
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो.क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली.या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला.कामाचे कमी तास,चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची क्लारा झेटकीन यांच्या कल्पनेतून साकार झाला.याच दिवसाचे औचीत्याने म्हसळा नगर पंचायतीमध्ये सावित्री बाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून त्यांना वंदन करून महीला दीन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला महीला व बालकल्याण सभापती सुमैया आमदनी,नगर सेविका नौसीन चोगले,नगरसेविका राखी करंबे,नगरसेविका सरोज म्हशिलकर,कर निर्धारण अधिकारी दीपल मुंडये,ज्योती करडे आदि महीला कर्मचारी उपस्थित होते.महीला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,गट नेते संजय कर्णिक, नगर सेवक अनिकेत पानसरे,लेखाधिकारी श्री आंग्रे,अशोक सुतार,संतोष कुडेकर,प्रणित बोरकर,सचिन मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा येथे हि जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून अ.नि. स. म्हसळा शाखेच्या वतीने प्रा. विनयकुमार सोनावणे प्रा. मेघश्याम लोणशीकर. प्रा महाजन सर, यांच्या वतीने आपले संविधान देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्या देण्यात आल्या या वेळी श्रीम. हाके मॅडम, प्रा. श्रीमती जमदाडे, प्रा. श्रीम कुताडे श्रीम. भोसले मॅडम, श्रीम. शिंदे, श्रीम. शिर्के उपस्थित होते.