दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी -बालाजी देशमुख
बीड—महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील – गौण खनिज वाहतुक करणा-या वाहनांना जी. पी. एस. (GPS) यंत्रणा बसविणे अनिवार्य असल्याचे कळविले असून याअनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये गौण खनिज वाहतूक करणा-या वाहन धारक / चालक यांनी त्यांच्या वाहनांना दि. 15 मार्च 2023 रोजी पूर्वी ए आय एस 140 मान्यता प्राप्त संस्थेकडून वाहनास जी. पी. एस. (GPS) यंत्रणा बसवून कार्यान्वित करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी केले आहे.या कामासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या मार्फत दि. 15 व 16 मार्च 2023 रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. सर्व गौण खनिज वाहतूक करणा-या वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांना जी. पी. एस. बसवून वाहने कार्यान्वित करून घ्यावीअन्याथा दि. 16 मार्च 2023 नंतर जी. पी. एस. यंत्रणा न बसवलेली वाहने कार्यालयाव्दारे ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असून वाहन रस्त्यावर आढळल्यास योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी.
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन मार्गदर्शक सूचना बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील – गौण खनिज वाहतुक करणा-या वाहनांना जी. पी. एस. (GPS) यंत्रणा बसविणे अनिवार्य असल्याचे कळविले असून याअनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये गौण खनिज वाहतूक करणा-या वाहन धारक / चालक यांनी त्यांच्या वाहनांना दि. 15 मार्च 2023 रोजी पूर्वी ए आय एस 140 मान्यता प्राप्त संस्थेकडून वाहनास जी. पी. एस. (GPS) यंत्रणा बसवून कार्यान्वित करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी केले आहे.या कामासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या मार्फत दि. 15 व 16 मार्च 2023 रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. सर्व गौण खनिज वाहतूक करणा-या वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांना जी. पी. एस. बसवून वाहने कार्यान्वित करून घ्यावीअन्याथा दि. 16 मार्च 2023 नंतर जी. पी. एस. यंत्रणा न बसवलेली वाहने कार्यालयाव्दारे ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असून वाहन रस्त्यावर आढळल्यास योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची सर्व वाहन धारकांनी नोंद घ्यावी.
