
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनीधी -नवनाथ डिगोळे
चाकूर येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिराचा कलशारोहन सोहळा दि.११-१२-१३- मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या निमित्ताने खालील विविध धार्मिक कार्यक्रमाची रुपरेषा
दि.११-०३-२३ वार-शनिवार रोजी स. १० वा.शोभायात्रा, कलश मिरवणूक
दि.१२-०३-२३ वार-रविवार रोजी मंत्रविधान विधी
दि.१३-०३-२३ वार- सोमवार रोजी स. ९ वा.श्री गणेशमुर्ती प्राणप्रतिष्ठा, गुरुवर्य श्री.ष.ब्र.१०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा व महाप्रसादाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
वरिल कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्यांने आणि ईश्वरीय कृपनेच संपन्न होत आहे. आपल्या मंदिराचा हा आपला सोहळा आपण तन,मन,धन अर्पुन सेवाभावाने,भक्तीभावाने साजरा करत परमेश्वराचरणी लीन होवुन पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी व महिलांनी वरिल कार्यक्रमात जास्तीच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चाकुर ग्रामस्थ व जिर्णोध्दार बांधकाम समिती चाकुर च्या वतीने करण्यात आले आहे.