दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षीण मतदार संघातील मौजे पिंपळगाव येवला येथील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या १ कोटी रुपयांच्या कामाचा व शेतकऱ्यांना दळणवळणाची सोय व्हावी यासाठी पांदन रस्त्यच्या ९६ लक्ष रुपयांच्या कामांचा शुभारंभ दि.५ एप्रिल रोजी २०२३ रोजी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्य श्रीनिवास मोरे, सरपंच प्र. दयानंद पाटील येवले, उपसरपंच तोंडचिरे, संतोष घाटोळ, शंकरराव सावळे, चेअरमन तुकाराम येवले, अंकुश जाधव, मधुकर येवले, कैलास मोरे,श्री सिद्धिविनायक मंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मण सावळे, अहमद शेख,सलिम शेख , रोजगार सेवक ज्ञानोबा येवले ,विनायक चव्हाण, नागोराव येवले, यांच्या सह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना आ.मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले की, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आहे त्यांना जाण्या- येण्यासाठी पिंपळगाव येवला येथे पांदन रस्त्याचे ९६ लक्ष रुपयांचे काम मंजूर केले. तसेच येथील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून हर घर जल या प्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असुन या दोन्ही कामाचे उद्घाटन झाले असे मी जाहीर करतो व सदरील कामे ही दर्जेदार झाले पाहिजे .
मी या गावचे आभार मानतो या गावाला एक सुशिक्षित सरपंच मिळाला त्यामुळे गावाचा विकास होत आहे. तसेच या भागाचा भूमीपुत्र शेतकऱ्यांचा पुत्र ते गावांसाठी मेहनत घेत आहेत.
भाजपा सरकारच्या काळात किती वेळा नारळ फोडले पण कामे झाली नाहीत .
मागील ७० वर्षात व ५ वर्षात मतदार संघात ५ कोटी ते २०कोटी पर्यंत कामे झाली.
पण मला मतदार संघाचा ध्यास असुन मी मतदार संघात ५०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे.
मराठवाड्याचा व महाराष्ट्राचा विकास चव्हाण परीवारांनी केला आहे. ३२३७ धरणे कै. शंकरराव चव्हाण यांनी बांधले आहेत त्यामुळे महाराष्ट्राची तहान भागली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा विकास केला आहे. त्यांचे सभागृहात भाषण असेल तर सर्वजण शांत बसून ऐकतात त्यामुळे बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी रहा. मी येथे २० ते २५ वेळेस आलो आहे . मी शेतकऱ्यांचा पुत्र आहे. माझा फोन माझ्या जवळ असतो पि.ए.जवळ नसतो कुणीही फोन लावला तर त्यांचा फोन उचलून कामे करतो.
पिंपळगाव येवला येथे आता पर्यंत मुस्लिम स्मशानभूमीसाठी १०लाख रूपये निधी दिला आहे. गणपती मंदिराच्या कंपाऊंड वॉल साठी १० लाख रुपये ,दलित वस्तीत हायमाॅकस लावण्यासाठी ६ लाख रुपये , तांडा वस्ती साठी १० लाख रुपये, सभागृहासाठी १० लाख रुपये आदी एकुण येथे २.५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण , स्मशानभूमीसाठी रस्ता आदी मागण्या आल्या आहेत ते सर्व कामे निश्चित पणे केली जातील तसेच पिंपळगाव येवला येथे विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार मोहन अण्णा हंबर्डे म्हणाले.
