दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे अखंड हरीनाम सप्ताह श्रीराम कथा ज्ञानयज्ञ
किर्तन सोहळा आयोजन हनुमान मंदिर येथे दि. 6एप्रिल २०२३ ते 13एप्रिल २०२३ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. सदर रामायण सप्ताहाच्या निमित्ताने कथा प्रवक्ता श्री ह भ प सतीश महाराज जाधव यांच्या अमृतमय वाणीतून रामकथा मार्गदर्शन करणार आहे. तरी या कथा अमृताचे रसपान करुन आपली जीवन नौका भवसागरातून पार करावी असे आवाहन साप्ताहचे मार्गदर्शक ह भ प श्रीकांत महाराज वडगावकर व आयोजकांच्या वतीने करण्यात आले. सप्ताहानिमीत्त किर्तन सोहळा, काकडा,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन, राम कथा, हरिपाठ व हरिकिर्तन, हरिजागर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सांगता शनिवार (13) रोजी होणार आहे.
साप्ताहतील कीर्तन कार दि.०६/०४/२०२३ रोज गुरुवार श्री.ह.भ.प.प्रसाद महाराज काष्टे
दि. ०७/०४/२०२३ रोज शुक्रवार श्री.ह.भ.प. अमृत महाराज जोशी
दि. ०८/०४/२०२३ रोज शनिवार श्री.ह.भ.प.शिवा महाराज बावस्कर
दि.०९/०४/२०२३ रोज रविवार
श्री.ह.भ.प.विलास महाराज गेजगे दि.१०/०४/२०२३ रोज सोमवार श्री.ह.भ.प.सतीष महाराज जाधव
दि. १९/०४/२०२३ रोज मंगळवार ह.भ.प.सोपान महाराज सानप
दि. १२/०४/२०२३ रोज बुधवार
ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटिल
दि. १३/०४/२०२३ रोज गुरूवार रोजीसकाळी 11ते 1
श्री. ह. भ. प. समाधान महाराज शर्मा याचे काल्याचे कीर्तन होईल नंतर व महाप्रसाद. तरी भाविकांनी सदर कथा,कीर्तन महाप्रसाद कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन केहाळ वडगाव येथील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
