दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर नांदेड महामार्गावरील देगलूर तालुक्यातील खानापूर फाट्याजवळील घटना
देगलूर: देगलूर नांदेड राज्य महामार्गावरील देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा जवळ असलेला कंतेवार यांच्या शेताजवळ एका ट्रकने मोटर सायकलस्वरास चिरडले त्यात मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.
देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील उमेश नागनाथ विविदवार (१९) हा ता.५ रोजी एका खाजगी कामासाठी स्कुटी क्रमांक एम एच २६ बि डब्ल्यू ४७५० वर बसून वन्नाळी येथून नांदेड-देगलूर महामार्गाने देगलूर कडे जात होता. तो सकाळी ७:३० वाजता खानापूर फाट्याजवळील असलेल्या कंतेवार यांच्या शेताजवळ आला असता त्याच्यासमोर एक बैलगाडी असल्याने तो बैलगाडीच्या बाजूने स्वतःच्या ताब्यात असलेली स्कुटी समोर घेत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम एच २६ बि ई ९४६३ या ट्रकचा ट्रक चालक तिरुपती केरबा शेळके राहणार काकांडी यांनी आपल्या ताब्यातील ट्रक हयगये पणे भरधाव वेगाने चालवत समोरून येणाऱ्या स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी चालक हा ट्रकच्या समोरील टायर खाली आला. त्याही अवस्थेत ट्रक चालकाने १५ ते २० फूट पुढे त्या स्कूटी चालकास सरपटत नेल्याने स्कुटी चालकाच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत होऊन तो जागीच गत प्राण होऊन घटनास्थळीच जीव सोडला . घटनास्थळी हजर असलेले खंडू उर्फ संकेत संजय पाटील रा. वन्हाळी ता. देगलूर यांच्या जवाबा वरून देगलूर पोलीस ठाण्यात ट्रक व ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
