दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
गळेगाव,वझरगा तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामासाठी मन्याड नदी दोन्ही पत्रामधून जीव मुठीत धरून येजा करावा लागतो.
देगलूर( दि.०६) देगलुर तालूका व बिलोली तालुक्याच्या सीमेलगत वाहणाऱ्या देगलूर तालुक्यातील वझरगा मन्याड नदीतुन महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक मंडळ सगरोळी यांच्या सहकार्यातून मन्याड नदीतुन गाळ काढण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना जरी खुशी होत असली तरी या नदी पात्रापलीकडे ज्या शेतकऱ्यांची शेती आहे.मन्याड नदीने रौद्ररूप धारण करून बेट तयार केला आहे त्यामुळे बेटावरील जमिनीची मशागत करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला गाळ काढण्या अगोदर नदीचा सामना करून बेटावरून शेतीकडे जाणे शक्य होत होते, परंतू आता ये जा करणे शक्य होत नाही.
तरी वझरगा येथून तुप शेळगाव डांबरीकरण रस्त्यालगत ही नदी रस्त्यालगत शंभर मिटर अंतरावर आहे.त्याठिकाणी शिव रस्ता उपलब्ध आहे.
त्या शिवरस्त्यालगत एक छोट्या पुलाचे बांधकाम करून द्यावे,अन्यथा त्या शेतीतील पेरणी नांगरणी,वखरणी खुरपणी,अन्य शेतीतील कोणतीही कामे पुलाची व्यवस्था न केल्यास शेतकऱ्याची कामे . कोणतीच होत नाहीत. व जाणाऱ्या शेतकऱ्यांत मात्र शेतीकडे जाण्यासाठी असंतोष निर्माण होत आहे.तरी धरण अथवा रस्ता नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहा, कंधार, मुखेड तालुक्यातून वाहत येणारी मन्याड नदी ही बिलोली व देगलूर तालुक्याच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे गोदावरी मांजरा नदीला वरुन तेलंगणा राज्यास मिळते. सद्यस्थितीत या मन्याड नदीतून देगलूर तालुक्यातील वझरगा पासून ते मांजरा नदीपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरू आहे.हे गाळ देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीतुन महाराष्ट्र शासन आणि संस्कृत संवर्धन मंडळ सगरोळीच्या संयुक्त विद्यमाने ‘चला नदी जाणूया’ या उपक्रमांतर्गत काढण्यास सुरवात करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने हे गाळ काढत असताना मन्याड नदीची खोली ही जास्त प्रमाणात वाढणार असल्याने मन्याड नदीतुन शेतीकडे जाण्यास आता शेतकऱ्याला शक्य नसल्याने या ठिकाणी या देगलूर तालुक्यातील वझरगा व बिलोली तालुक्यातील गळेगाव मध्ये असलेल्या मन्याड नदीवर धरण बांधणे अत्यंत गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
कारण,बिलोली तालुक्यातील गळेगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन मन्याड नदी पलीकडे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेळगाव शिवरालगत आहे.त्याच प्रमाणे देगलूर तालुक्यातील वझरगा व तुपशेळगाव येथील शेतकऱ्यांची बरीचशी शेतजमीन ही बिलोली तालुक्यातील गळेगाव शिवारात असल्याने दोन्ही शिवाराच्या मध्ये मन्याड नदी पात्र असल्याने शेतकऱ्यांना त्या मन्याड नदीपात्रातुन शेती कामसाठी ये जा करण्यासाठी जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह अचानक पणे वाढल्यास शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या परिस्थितीत या मन्याड नदीतून गाळ काढल्याने मन्याड नदीची खोली जास्तीची होत असल्याने याठिकाणी शासनाने धरण बांधकाम करून शेतकऱ्यांना रहदारी साठी रस्ता तयार करून द्यावे अशी विनंती देगलूर तालुक्यातील वझरगा, तुपशेळगाव व बिलोली तालुक्यातील गळेगाव येथील शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणीसाठी जोर धरत आहेत.
