
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)
कारंजा(घा) तालुक्यातील युवा नेतृत्व विश्वभुषन विनोदराव पाटील यांची दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रती अधिवेशनासाठी निवड झाली आहे.दि. २५ ते २७ एप्रिल या कालावधीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये हे अधिवेशन होणार आहे. देशाच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि केंद्रीयमंत्री या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना देशातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय विषयक विविध महत्त्वांच्या विषयावर चर्चा करण्याची आणि ठराव मांडण्याची संधी, या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळणार आहे. दहा वेगवेगळ्या केंद्रीय समितीचे पदाधिकारी, या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. विश्वभुषन पाटील यांचे विद्यार्थी हितासाठीचे असलेले काम आणि अनुभव, यामुळेच त्यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि कौशल्य विकासाचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह आहे. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.