दैनिक चालु वार्ता सांगोला तालुका प्रतिनिधी -प्रभाकर कांबळे:
सांगोला तालुक्यातील महुद या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी रमजान ईद चे औचित्य साधून महुद-सांगोला येथील मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या त्या दरम्यान सांगोला तालुक्यातील सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,विभागप्रमुख संतोष खडतरे,शहर प्रमुख अस्लम मुलाणी,उप तालुका प्रमुख गणेश कांबळे, सांगोला शहर प्रमुख कमुरुद्दीन खतीब, भारत नाना गवळी, प्रकाश जाधव, नितीन वडे,दै. पुढारी चे दीपक धोकटे तसेच समस्त मुस्लिम समाज व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक गुप्त बैठक मुलाणी यांच्या निवासस्थानी बंद दरवाजात झाली या बैठकीत काय झाले हे गुलदस्त्यात आहे.
