
दैनिक चालु वार्ता उपसंपादक-
आष्टी(श)(वर्धा): हिंगणघाट येथील २४ वर्षीय तरुणीच्या आरोपात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण २ महिन्यापासून फरार आहे मात्र तपासी अधिकाऱ्यांना अद्यापही सापडत नसल्याने पोलिसावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे याबाबत असे की,आरोपी पोलीस निरीक्षक संपत चव्हाण याने हिंगणघाट येथील २४ वर्षीय तरुणीला ब्लॅकमेलिंग करून अत्याचार केल्या प्रकरणी ६ मार्च २३ रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये ३७६(२)अ(१) (न) ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला त्यात फिर्यादी युवतीने दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले की,आरोपी पोलीस निरीक्षकाने तू माझ्याशी मैत्री कर, तेव्हा तुझी तक्रार दाखल करतो असे म्हणत पीडित युवतीशी सलगी साधत व्हिडिओ करून ब्लॅकमेलिंग केले याप्रकरणी आरोपीनी अटकपूर्व जामीनासाठी हिंगणघाट कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली असता त्याचा जमीन अर्ज २४ मार्च रोजी फेटाळला असता आरोपीने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे धाव घेतली मात्र या घटनेला दोन महिने होवूनही तपास अधिकारी यांना आरोपी सापडत नाही आहे शिवाय आरोपींनी पोलिसांच्या नाकावर टिचून घरगुती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केल्याची माहिती समोर येते आहे पण तरीही आरोपी पोलीस निरीक्षक तपासी अधिकाऱ्यांना सापडत नाही आहे यावरून तपासी अधिकारी आरोपीला अभय तर देत नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यासाठी दबंग पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी या प्रकरणात जातीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे
अत्याचाराचे प्रकरण असल्याने प्रतिक्रिया देता येत नाही तसे फिर्यादीचे म्हणणे आहे
सुनील दहिभाते
तपासी पो.अधिकारी
पो.स्टे.गिरड