
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
नांदेड :- आंबेडकरी चळवळीचे नेते तथा रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संघटक अनिलदादा गायकवाड गेल्या विस वर्षापासुन निष्ठेने काम करतात व गोरगरीबांच्या अडचणीला व मदतीला धाऊन जातात अशा या नेत्यांच्या ४३ व्या वाढदिवसा निमित्त रिपब्लिकन सेना तालुका लोहा च्यावतीने शासकीय विश्रामगृह लोहा येथे “अभिष्टचिंतन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले होते.अनिलदादा गायकवाड यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी लोहा तालुक्यातील त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासुन लोहा येथील शासकीय विश्रामगृह परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.व तालुक्यातील आंबेडकरी जनतेने व त्यांच्या मित्र परिवाराने अनिलदादा गायकवाड यांचा भव्य आतिषबाजी करुन व भव्य सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माझे राजकीय गुरु लोहा नगर परिषदेचे नगरसेवक बालाजी खिल्लारे, नगरसेवक नबि शेख,काॅंग्रेस कमिटी लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, जनतेचे मत माझे मत दैनिकाचे संपादक फेरोजभाई मणियार,माजी नगरसेवक उत्तम महाबळे,शेख शरफोदीन,अनिल दाढेल, खडकमांजरीचे माजी सरपंच श्यामसुंदर वाघमारे, उपसरपंच संतोष वाघमारे,युवा नेते सुधाकर किरवले,माधव काकडे, संतोष भावे,मोहन कांबळे,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल हंकारे,राहुल सोनवणे,संभाजी भुजबळ,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पालम तालुका प्रमुख बालाजी पाटील लोखंडे,युवा नेते छगन हटकर,सिध्दार्थ ससाणे,वंचित बहुजन आघाडी नांदेड (द.) युवा जिल्हाध्यक्ष धिरजभैय्या हाके,नवनाथ आढाव,खंडु पवार व कारेगाव ची मुलुख मैदानी तोफ कपिल किरवले,पत्रकार विश्वनाथ कांबळे,विकास वाघमारे,राहुल एडके,राम एडके,सामाजिक कार्यकर्ते व विद्रोही कवि गिरीष भालेराव आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.