
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-प्रेम सावंत
परभणी : परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने गुरूवार दि.११ मे २०२३ रोजी पत्रकारांच्या जिव्हाळ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील उपोषण मैदानावर ३ तास धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेच्या पदाधकाऱ्यांसह सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. पत्रकारांच्या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास या पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी राज्यभरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनास पाठींबा म्हणून परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पाथरी, पूर्णा, पालम, सोनपेठ तहसील कार्यालया समोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील उपोषण मैदानावर परभणी जिल्हा, शहर आणि साप्ताहीक कार्यकारिणीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारीतेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी, पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी देण्यात यावा, वृत्तपत्रांना जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करण्यात यावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात यावा, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक ठरणारे आहे त्यासाठी साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
पत्रकारांच्या मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या मार्फत निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेचे राज्य कार्यवाहक सुरज कदम, मराठवाडा उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कैलास चव्हाण, श्रीकांत देशमुख, सय्यद युसुफ, शेख मुबारक, सुदर्शन चापके, विजय कुलकर्णी, सुधीर बोेर्डे, प्रदीप कांबळे, मंदार कुलकर्णी, मुधकर खंदारे, नरहरी चौधरी, मोईन खान, विवेक मुंदडा, के.डी. वर्मा, अरूण रणखांबे, किरण स्वामी, रवी मानवतकर, शैलेश काटकर, अनिल कुºहे, भुषण मोरे, विश्वंभर तेलीअप्पा, संदीप ढाले, सोमनाथ स्वामी, दिलीप बोरूळ, नजीब सिद्दीकी, राहुल धबाले, बालाजी कांबळे, रियाज कुरेशी, सय्यद जमील, संग्राम खेडकर, शेख नयुम अहेमद, अब्दुल रहीम खान, रमेश नाटकर, रामप्रसाद ओझा, आबासाहेब देशमुख आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहेत.