
दैनिक चालु वार्ता नांदेड जिल्हा उपसंपादक -गोविंद पवार
लोहा शहरांच्या पश्चीमेला हाकेच्या अंतरावर असलेल्या मौ. हळदव येथे श्री साईबाबा देवस्थान मंदिरात दि.११-५-२०२३ रोजी श्री साईबाबांच्या मुर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली करण्यात आली .
यावेळी सकाळी ११ वाजता श्री साईबाबा मंदिरात श्री साईबाबा यांच्या मुर्तीची स्थापना विधिवत होम यज्ञ करून करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाला हळदव,लोहा, चितळी, धानोरा,बेरळी, पारडी,सुनेगाव सह आदी गावातून भाविक भक्त मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
तसेच आज दि.१२-५-२०२३ रोजी कलशारोहण, हभप श्री मुडेकर महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तेव्हा या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा हळदव चे उपसरपंच प्रल्हाद पाटील वडजे, भाजपा युवा मोर्चा चे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, पेमराव माली पाटील वडजे, दत्ता पाटील पवार, निवृती पाटील वडजे घनश्याम पाटील पवार, व्यंकटराव पाटील पवार, विठ्ठल पाटील वडजे, सुर्यकांत पाटील पवार, दिगंबर पाटील पवार ,पिंटू पाटील पवार, मनोहर पाटील कदम, भालचंद्र पाटील कदम, नरहरी पाटील पवार, मधुकर पाटील वडजे, रंगनाथ पाटील पवार, रावसाहेब पाटील इंगोले,वामन पाटील पवार, आप्पाराव जोगदंड यांच्या सह श्री साईबाबा देवस्थान समिती हळदव व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.