
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर – मोहन आखाडे
केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अन्न वाचवा समितीला लोकसभा अध्यक्ष श्री ओमजी बिर्ला यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित केले होते.त्यानिमित्त अन्न वाचवा समिती तर्फे लोकसभा अध्यक्ष श्री ओमजी बिर्ला यांचा मोठा गूलाब हार घालून त्यांचा सत्कार अनंत मोताळे , ॲड.श्रीचंद जग्याशी, राजेंद्र वाहुळे व अन्न वाचवा समिती सदस्यांनी केला. त्याच वेळी अन्न वाचवा समितीतर्फे अन्नासाठी, अन्न नासाडी थांबण्यासाठी कठोर कायदा करावा म्हणून निवेदन देण्यात आले. *केंद्रीय कार्यकारिणी वाणी समाज संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे केंद्रीय अध्यक्ष प्रभाकर दिवटेआणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत शहर संघटन मंत्री श्री नागेश गव्हले यांनी लोकसभा अध्यक्ष श्री ओमजी बिर्ला यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.* अन्न वाचवा समिती तर्फे अध्यक्ष अनंत मोताळे, ॲड. श्रीचंद जग्यासी,अजित राणा, प्रभाकर दिवटे, नागेश गव्हले, राजेंद्र वाहूळे, दिलीप आसबे, लाटकर,पाथ्रीकर, सौ.जोशी,सौ.शेरखाने,सौ.सोनवणे,सौ. खैरे,सौ.घोडतूरे, सौ.किरण शर्मा कार्यक्रमास उपस्थित होते