
दैनिक चालू वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजयी झाल्या बद्दल औरंगाबाद जिल्हा शहर काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील काॅग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर ढोल, ताशे, फटाके वाजवून आणि एकमेकाच्या तोडात जिलेबीचा वेढा भरून मोठ्या थाटात व जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मा. शेख युसुफ यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाशी बोलताना विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारने चुकीच्या व हुकूमशाही च्या पध्दतीने राज्यकारभार करत असल्यामुळे, विरोधी पक्षाची सत्ता ज्या ज्या राज्यात असेल तेथील सरकार पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर फोडून फोडा आणि झोडा ह्या नीतीचा वापर करून व विविध शासकीय यंत्रणेचा गैर वापर करून विरोधी पक्षाचा व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यावर व लहानसहान उद्योग करून पोट भरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खड्यात ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळेच कर्नाटकातील सर्व सुजान जनतेने आज भाजपा येथून सत्तेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि सर्व जाती, धर्माला एकत्र घेऊन चालणाऱ्या काॅग्रेस पक्षाला प्रचंड व स्पष्ट बहुमताने विजयी केले त्या बद्दल कर्नाटक जनतेचे आभार मानून सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या काळातही महाराष्ट्रासह देशात काॅग्रेस पक्षाचीच सत्ता येणार असल्याचे सांगितले.
यावेळी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ लीडर महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीचे पदाधिकारी डॉ. जफर खान, इब्राहिम पठाण अड सय्यद अक्रम जिल्हा महिला काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. हेमा ताई पाटील, शहर अध्यक्षा मा. दिपाली मिसाळ, डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल डॉ अरूण सिरसाठ, मा. रंगनाथ काळे, एम. ए, आझर, अथ्थर शेख, मुज्जफर खान पठाण, अमेर अब्दुल सलिम शेख, डॉ निलेश आंबेडकर, अथर शेख शेख रईस असमत खान सय्यद फैजीदुन शेख सलीम केशव नामेकर शीलाताई मगरे, रुबीनाताई सय्यद, विभावरीताई मोरे, सरोजताई जकब , माधवीताई चंद्रकी, परविनताई देशमुख, नगमाताई सिद्दिकी, मंजूताई लोखंडे, शुभांगी ताई गायकवाड, पूजाताई गायकवाड, सुहासिनी ताई घोरपडे यांच्यासह औरंगाबाद शहर काॅग्रेस कमिटीच्या सर्व फ्रेंच सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.