
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात दिग्रस ( बु ) हे गाव राष्ट्रीय महामार्ग 50 वर असून गावामध्ये सर्वच जाती-धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने नांदत असताना नगरीमध्ये विविध देवदेवतांचे पूजाअर्चा आपापल्या धर्मानुसार केली जाते त्याच अनुषंगाने गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य अश्वारूढ स्मारक असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा भव्य दिव्य स्मारक अतिशय दिमाखात चौकात रुबाबात उभे टाकले असून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचाही पूर्ण आकृती स्मारक रुबाबात उभे असलेले पाहाव्यास मिळतात याबरोबरच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब तसेच जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज तसेच महाराणा प्रताप चौक तसेच राजे छत्रपती संभाजी महाराज चौक व दिग्रस नगरीतील जामा मस्जिद अशा विविध महापुरुषांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन सुद्धा मोठ्या दिमागदार पद्धतीने केले जातात.. यातून जातीय सलोखा जोपासण्याचे काम केले जाते तसेच सर्व धर्म समभावाचे चित्र सर्व गावात दिसून येते . परंतु अलीकडच्या काळात गावामध्ये शिक्षित व उच्चशिक्षित तथा कर्मचाऱ्यांचा हौदोष मोठ्या प्रमाणात वाढला असून कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हुकूमशाही गाजवण्याचा प्रयत्न चालू झाला आहे तसेच एखाद्याने यावर जर जाब विचारला तर त्या व्यक्तीस अश्लील भाषेचा वापर करून तथा शिवराळ भाषेचा वापर करून वेळोवेळी अपमानित करण्याचे प्रयत्न अनेक वेळा केला जात आहे मग ती व्यक्ती गरीब असो अथवा उच्चशिक्षित असो अथवा गरीब कर्मचारी असो अशा लोकांचा बळी घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. . दिग्रस हे गाव नांदेड जिल्ह्या पासून 80 किलोमीटर अंतरावर असून जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून समजले जाते या गावात जवळपास दहा हजार लोकसंख्या असून अलीकडच्या काळात शिक्षित उच्चशिक्षित कर्मचारी तथा काही तुरळक गाव गुंडाचा हौदोष वाढला असल्यामुळे गावातील ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील तथा गावकरी हातबल झाले आहेत एवढेच नव्हे तर गोरगरीब सर्वसाधारण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनताही भयभीत झाली आहे. याही पलीकडे एखाद्या पत्रकाराने आवाज उठवला तर त्या पत्रकाराची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जात आहे. . काहीजण तर पैशाच्या जोरावर गोरगरिबांना ठेचून मारण्याचा प्रयत्न करत आहेत तर काहीजण मनगटाच्या व मनुष्यबळाच्या जोरावर सर्वसाधारण लोकांवर हुकुमशाही गाजवण्याचा व त्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे व छोट्या-मोठ्या गोष्टीवरून अश्लील भाषेचा वापर करून शिवराळ शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली जात आहे अशा या भीतीयुक्त वातावरणात कोणाच्या जीवितास भविष्यात काही हाणी झाल्यास याला कोण जबाबदार अशा प्रकारची चर्चा सर्व साधारण लोकांच्या ओठावर ऐकवयास मिळत आहे त्यासाठी या गंभीर बाबीची दखल , कदाचित भविष्यात काही घडलेच तर प्रशासनाने आवश्यक घ्यावी अशी सुद्धा मागणी जनतेतून केली जात आहे.