
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
निस्वार्थ व निष्पापपणे सेवा देणा-या परिचारिकेचा,त्यांनी दिलेल्या सेवेचा कुठे तरी आदर व्हावा या उद्देशाने मे महिन्याच्या १२ तारखेला जगात सर्व ठिकाणी परिचारिका दिवस धार्मिक उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येत असतो.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी वणी विभागीय भारतीय कोयला खदान मजदुर संघाच्या वतीने घुग्गुस परीसरात असलेल्या राजीव रतन केंद्रीय रुग्णालय घुग्गुस-वणी क्षेत्र,माजरी क्षेत्र,ताडाळी उर्जाग्राम, भालर वसाहत-वणी उत्तर क्षेत्र अशा विविध परिसरात असलेल्या रूग्णालयात जागतिक परिचारिका दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वेकोली कल्याण मंडळ सदस्य तथा संघाचे संघटनमंत्री कमलाकर पोटे, महामंत्री जगन्नाथ जेनेकार कोषाध्यक्ष मंगेश अजमिरे, कार्याध्यक्ष राजू नामपेल्लीवार , वणी-माजरी कार्यालय मंत्री विनोद ढुमने तसेच प्रमुख अतिथी म्हणून वणी क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद , क्षेत्रीय अध्यक्ष प्रमोद वंजारी, मंत्री देवराव नन्नावरे, विजय मालवी, वणी उत्तर क्षेत्राचे गुलाब चौधरी, केंद्रीय कार्यशाळा ताडाळी सोनेकर आणखी वणी क्षेत्रातील पदाधिकारी तथा विभागातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिचारिकांना सन्मानीत करण्यात आले.
माजरी क्षेत्राच्या विभागिय रुग्णालयात वणी-माजरी क्षेत्राचे संयुक्त महामंत्री मोरेश्वर आवारी प्रमुख उपस्थितीत क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ.उंबरकर, क्षेत्रीय संघ अध्यक्ष गजानन निमकर, पि.एस.रामटेके, नाना महाकुलकर, संजय बावने, संजय झाडे यांचेसह माजरी क्षेत्राचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्रीय कार्यशाळा ताडाळी दवाखान्यात, उर्जाग्राम संघ उपाध्यक्ष हरिश्चन्द्र सोनेकर, मंत्री लोहबडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत व वणी क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद साहेब, विभागिय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिचारिकांना सन्मानित केले।
*विभागीय दवाखाना, भालर वसाहत, वणी उत्तर येथे कमलाकर पोटेजी-सदस्य वेकोली कल्याण मंडळ सदस्य तथा संघ संघठनमंत्री कमलाकर पोटे, महामंत्री जगन्नाथ जेनेकार, कोषाध्यक्ष मंगेश अजमिरे , वणी माजरी विभागीय महिला प्रमुख पुजाताई मेंढुले यांच्या उपस्थितीत व क्षेत्रीय आरोग्य अधिकारी डॉ. चक्रवर्ती साहेब, वणी उत्तर क्षेत्र, वणी विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिचारिकांना व बंधुना सन्मानीत केले अशाप्रकारे चारही क्षेत्रातील कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.अशी माहिती संघाचे महामंत्री जगन्नाथ जेनेकर यांनी कळविली आहे.