
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/पेठवडज :- जलसंपदा अधिकारी मंडळ पेठवडज यांच्याकडे पाणी सोडा असे म्हणून दहा ते पंधरा शेतकरी गेले असता अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे उडवा उडवी करीत आहेत. आमच्या हातात काही नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातात ही कामे आहेत असे म्हणून जलसंपदा अधिकारी मंडळ पेठवडज येथील कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत आणि अतिवृष्टी चालु असताना भर पावसात कॅनल भरून पाणी सोडले होते . शेतीला उन्हाळ्यात चार दिवसाला पाणी द्यावे लागते आणि हे अधिकारी कर्मचारी पिके वाळून जात आहेत तर पाणी सोडत नाहीत.पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे असून हेच पाणी भेटण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या तोंडाकडे पहावे लागत आहे. पेठवडज परिसरात लवकरात लवकर कॅनलला पाणी सोडण्याची सोय करावी अशी मागणी मारुती बाबाराव डावकोरे,लक्ष्मण महाजन,दत्ता डावकोरे, संभाजी वेढांरे यांनी अनेक शेतकरी बांधवांनी जलसंपदा अधिकारी मंडळ पेठवडज येथील अधिकारी भगवान जानुरे यांच्याकडे केली आहे.