
दैनिक चालु वार्ता उपसंपादक छत्रपती संभाजीनगर- मोहन आखाडे
संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान, पुरस्कार प्रदान सोहळा
छत्रपती संभाजीनगर ता.१४: छत्रपती संभाजी महाराजांचे काही बखरकार,कादंबरीकारांनी विकृतीकरण केले.प्रत्यक्षात ते अनेक भाषा जाणणारे समतावादी, मानवतावादी, बुध्दीजिवी राजे होते असे प्रतिपादन विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी (ता.१४) केले.
छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल कमिटी दिल्ली पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मोगलांच्या इतिहासकारांनी संभाजी राजे यांचा गुणगौरव केला आहे.ते परंपरावादी नव्हते.स्रीयांना सन्मान देणारे,कवी,लेखक,धाडशी असे बुध्दीजिवी राजे होते.तत्वांसाठी त्यांनी अतोनात हाल सोसले,मरण पत्करले पण ते झुकले नाहीत.याप्रसंगी प्रा.प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान झाले.त्या म्हणाल्या की,आपण राजमात जिजाऊ, सावित्रीबाई फुले,रमाई ,भाई या आपल्या खर्या महामातांची ओळख विसरलो त्यामुळे समाजात स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळते.स्रीया संस्कार शाळा असतात.तरीपण स्रीयांवर अन्याय अत्याचार होतात याचाच अर्थ आपल्या संस्कार शाळांचा अभ्यासक्रम चुकला आहे.आपण स्रीयांना बळी जाण्याचे संस्कार करतो आहोत.जिजाऊ,रमाई यांनी परंपरांच्या चौकटी झुगारल्या म्हणून त्या ईतिहासावर आपली मुद्रा उमटवू शकल्या.मातृदिनाच्या निमित्ताने आपण हा वारसा पुढे नेण्याची गरज आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॉम्बे हायकोर्टच्या सेवानिवृत्त जस्टिस साधना जाधव होत्या.त्या म्हणाल्या की, छत्रपती संभाजी महाराज यांनी जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन राज्यकारभार केला.औरंगजेबाच्या मुलाला संरक्षण दिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संवैधानिक मूल्ये दिली.हे ऋण विसरता येणार नाही.
प्रास्ताविक इंजि.मिलिंद लक्ष्मीकांत पाटील यांनी केले.यावेळी मातृदिनानिमित्त निर्मलाताई पाटील याचा आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणारे सुनील गिर्हे, प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक व्यंकटराव केंद्रे,शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ सिताराम जाधव, अॕड.अमरजितसिंह गिरासे ,सामाजिक क्षेत्रातील राजेंद्र सरोवर, मिर्झा सलिम बेग, नगरपरिषदेचे प्रशासक नंदकिशोर भोंबे , चित्रकार आप्पासाहेब काटे आदिंचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले की,घरातील मातांनी चुकीचा सिलॅबस स्वीकारल्याने गुन्हेगारी वाढली आहे.अशावेळी पोलिसांना आईची भूमिका साकारावी लागत आहे.यावेळी सत्काराला सूर्यकांताताई गाडे यांनी उत्तर दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी केले.यावेळी मंचावर आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष निकम,एस.पी.जवळकर,शेख मन्सूर मुस्तफा,उत्तम काळवणे, रविंद्र बोडखे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी निशांत पवार, सुनील बोराडे, आकाश लोणकर, राष्ट्रपाल वानखेडे, सुनील पाटील,एस.बी.पाटील,पंचशिला खोब्रागडे, लताबाई थोरात,स्वप्निल औराळकर,चेतन महाले , मनिषा खंडागळे,वर्षा दारोळे आदिंसह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.आभार प्रा.राजेंद्र नेवगे यांनी मानले.