
दैनिक चालु वार्ता उप संपादक, धाराशिव -नवनाथ यादव
भू म:-महा.एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्रीश्री रविशंकर गुरुदेव यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातल्या ६७ ठिकाणी शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भुम या ठिकाणी शिबिराला लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. रक्तदान म्हणजे आपले निरोगी रक्त गरजू व्यक्तींसाठी दान करण्याची कृती आहे.जे लोकांना आपली जात-पंथ- धर्म आणि इतर गोष्टींचा विचार न करता रक्तदान करतात हे त्यांच्यातील मानवतेचे खूप मोठं लक्षण आहे. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे रविशंकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व पर्वकाळी मोठे प्रमाणात रक्तदान शिबीर घडविण्यात आले. श्रीश्री रवीशंकर यांचा वाढदिवस रक्तदानाची मोठी मोहीम व्हावी यासाठी श्रीमुंदडा हे प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रभर मिळालेला रक्तदानाचा उत्तुंग प्रतिसाद पाहत श्रीश्रींचा वाढदिवस रक्तदानाची चळवळ होत आहे याबद्दल समाधान वाटते.जनविकास सामाजिक बहुउद्देशीय संस्था भूम च्या वतने रक्तदान शिबीराचे आयोजन करत महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सेवेचे कार्य केले यां बद्दल उपस्थित नागरिकांनी विशेष समाधान दर्शविले. यावेळी संस्था कार्यवाहक प्रदीप साठे , सचिव संजयकुमार गायकवाड , आर्ट ऑफ लिविंग चे बिभीषण नागरगोजे , अण्णासाहेब खटाळ , राजेंद्र सोनाईकर ,भा.ज.पा जिल्हा सरचिटणीस आदम शेख , शहर सरचिटणीस हेमंत देशमुख , अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मेहबूब शेख , जेष्ठ व्यापारी चंद्रकांत गवळी , सचिन बारगजे , श्रीपाद देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले, ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी विशेष मार्गदर्शन केले.