
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
जिल्हयातील विविध पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात वर्षानुवर्ष फरार/पाहिजे असलेले आरोपीतांचा कसोशिने शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश मा. मनिष कलावानिया, पोलीस अधीक्षक यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
याअनुषंगाने पोलीस ठाणे विरगाव येथे दिनांक 2/7/2010 रोजी गाढे पिंपळगाव येथील रेवनाथ निवृत्ती सोनवणे व इतर 09 अशा एकुण 10 व्यक्ती विरोध्दात अनाधिकृत रित्या बोगस खत विकल्या प्रकरणी गुरंन 46/2010 कलम 420,34, भादवी सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 व खत नियंत्रण अधिनियम 1985 कलम 3,4,5,7,8,19,21,23,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाले पासुन यातील आरोपी नामे अभिजीत भालचंद्र थोरात रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे हा फरार होता व नमुद गुन्हयात तो पोलीसांना सन-2010 पासुन पाहिजे होता.
नमुद आरोपीचा पोलीस ठावठिकाणा शोधुन काढण्याचा कसोशिने पर्यंत करत होते. परंतु आरोपी हा पोलीसांना मागील 13 वर्षापासुन त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवुन व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून गुंगारा देत होता. तरीही पोलीस आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करत असतांना विरगाव पोलीसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली कि पाहिजे असलेला आरोपी अभिजीत भालचंद्र थोरात हा पुणे येथील यवत या गावी स्वत:चे अस्तिव लपवुन त्यांने एक किराण दुकान टाकले आहे. व तेथे तो नाव बदलुन व्यवसाय करुन राहत आहे. या मिळालेल्या माहितीच्या आधारे विरगाव पोलीसांचे पथकांने तात्काळ यवत ता. दोैंड जि. पुणे येथे जावुन आरोपीच्या किरणा दुकानाचे परिसरात वेशांतर करून सापळा लावला. आरोपी हा किरणा दुकानात असतांनाच त्याचेवर पाळत ठेवुन त्याचे ओळखी बाबत खात्री झाल्याने विरगाव पोलीसांनाचे पथकांने घेराव टाकुन अचानक त्याचे वर झडप घालुन त्याला जेरबंद केले आहे.
वरिल नमुद गुन्हयाती आरोपी आरोपी नामे अभिजीत भालचंद्र थोरात रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे हा पोलीसांना मागील 13 वर्षापासुन त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवुन व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून गुंगारा देत असतांना सुध्दा पोलीसांनी त्यांला अत्यंत सचोटीने व कसोशिने व कौशल्यपुर्ण पध्दतीने जेरबंद केले आहे.
नमुद कारवाई ही मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापुर श्री. शरदचंद्र रोडगे, सपोनि, नवनाथ कदम, पोलीस अंमलदार विजयसिंग खोकड यांनी केली आहे.