
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
▪️ नागरिकांच्या समस्येचे तात्काळ निराकरण निराकरण करावे-डॉ.विलास कविटकर
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- सुर्जी भागातील तहसील कार्यालय ते मरीमाता मंदीर या भागात सतत दुषित,दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली असून या भागातील पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन आज भाजपा ओबिसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास कविटकर यांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाला दिले आहे. सुर्जी भागातील नागरिकांना होणाऱ्या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देतेवेळी त्यांच्या समवेत सुर्जी भागातील शेकडो नागरिक महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयावर उपस्थित होते.