
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात रिक्त असलेली ग्राहक आयोगांच्या अध्यक्षांची पदे त्वरित भरून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जालना जिल्हा ग्राहक वकील संघाचे अॅड. महेश धन्नावत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे केली आहे.
ग्राहकांच्या न्याय प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण मागणी बाबत शुक्रवारी (ता. १९) जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या लेखी निवेदनात अॅड. महेश धन्नावत यांनी म्हटले आहे की, जिल्हास्तरावर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांची
पदे रिक्त आहेत तर सदस्यांना अधिकार नसल्याने ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणतेही आदेश अथवा कारवाई होत नाही परिणामी अनिश्चितता कायम राहत असल्याने जेष्ठ नागरिकांसह अन्य महत्त्वाची प्रकरणे प्रलंबित असून वकील, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अशी वास्तव परिस्थिती अॅड. महेश धन्नावत यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली.
ग्राहक आयोगाच्या सदस्यांना अधिकार नसल्याचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून
ते ग्राहकांची सर्रास लूट करत आहेत. असे नमूद करत अॅड. महेश धन्नावत यांनी अनेक दिवसांपासून रिक्त असलेली पदे शासनाकडून भरता येत नसल्यास ग्राहक संरक्षण कायदा रद्द करून कर्मचाऱ्यांना अन्यत्र नियुया द्याव्यात. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान आयोगांच्या अध्यक्षांची पदे तात्काळ भरावीत अथवा सदस्यांना अधिकार बहाल करावेत नसता ग्राहक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन केली जाईल, असा इशारा अॅड. महेश धन्नावत यांनी लेखी निवेदनात दिला आहे.