
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-पोले विष्णु मोहन
*लातूर/अहमदपूर*:-
तालुक्यातील मौजे सांगवी सुनेगांव तांड्याजवळील श्री नारायण दुर्गे (नाना) यांच्या शेतातील महावितरण मुख्य लाईनचे पोल वारे-वादळ होऊन आडवे झाले आहेत,सदरचे पोल पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करणे आवश्यक आहे अन्यथा कधीही पडण्याची शक्यता आहे.व त्यामुळे शेतकरी,गुरे,मोलमजूरी करणारे कामगार यांची जिवीतहानी होऊ शकते.तरी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत उपाययोजना करुन संभाव्य धोका टाळून पोल पडणे त्या पोलचा अन्य पोलवर ताण पडणार नाही, वायर तुटणार नाही व अशा अनेक समस्या निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशी संबंधीत शेतकरी नारायण दुर्गे यांनी विनंती केली आहे.या कडे प्रशाशनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे