
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-तालुक्यातील जिद्दीच्या बळावर सव्वाशे वर विद्यार्थी पोलीस दलात भरती झाले असून आता तालुक्याची ओळख मिनी गृह मंत्रालय म्हणून होणार आहे. पोलीस दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व युवा नेते साहिल गाढवे यांच्या हस्ते “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून अफाट मेहनतीच्या जोरावर राज्यात विवीध ठिकाणी पोलीस भरती झालेल्या शहरातील थ्री. एस.अकॅडमी, कर्मवीर अकॅडमी च्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला.यामध्ये अनुक्रमे पायल विलास गिरी(रायगड),मोहिनी ज्योतिराम कांबळे(अहमदनगर),आरती वागवकर(पुणे ग्रामीण),अनिकेत माने (पुणे शहर) व प्रीती कुंभार,नेहा साबळे,निकिता साठे,शरद क्षत्रिय,अशोक राठोड,बंडू डगले,ऋतुजा उगलमुगले,सागर जगदाळे,मुकुंद मासाळ,सौरभ खराडे,अजय खुळे, गणेश पाटूळे व करुणा कुटे हे सर्व मुंबई पोलीस पदी निवड झालेले विद्यार्थी असून वरील सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच या सर्व विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी ज्यांचं योगदान लाभलं असे थ्री एस अकॅडमी चे संचालक सोमनाथ देवकर,बालाजी डोरले सर,कर्मवीर अकॅडमीचे संचालक सचिन गोयकर यांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी सुरज गाढवे,बालाजी माळी,सुनील माळी,राम बागडे यांच्यासह सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व पत्रकार बांधव उपस्थित होते.