
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
जि.प.हायस्कूल खानापूर शाळेत प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर,वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असून दहावीनंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत (सायन्सला) प्रवेश घ्यावा का नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेल्या वर्षभर विज्ञान,गणित या महत्वपूर्ण विषयाचे पद रिक्त होते तर सतत मागणी करून यावर्षी हे पद भरते न भरते तेच इंग्रजी विषयाच्या पदाची जागा रिक्त झाली असून जवळपास आठवी ते दहावीतील 120 विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यावर अन्याय आहे. समस्त गावकरी मंडळीच्या वतीने “शतक महोत्सवी 2028” ही संकल्पना चालू असून वारंवार पदरिक्त राहणे हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व संकल्पनेला बाधा पोहोचवणारे आहे.
जर हे पद 15 जून शैक्षणिक वर्षापर्यंत भरण्यात आले नाही तर समस्त गावकरी मंडळी खानापूरच्या वतीने सनदशीर मार्गाने शाळेला कुलूप ठोकून शाळा “जिल्हा परिषद नांदेड “येथे भरवण्यात येईल. असे निवेदन देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जितेश अंतापूरकर (आमदार) यांना देण्यात आले.लगेच अंतापुरकर सी.ओ. मॅडमशी संपर्क साधला. व विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते अनंत पाटील,मा उपसरपंच राजेश्वर अटकळे सर,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार जी ताडकोले, मा. सरपंच पंडितराव वाघमारे सर,काँग्रेस सर्कल प्रमुख विश्वनाथ ताडकोले सर, युवक काँग्रेसचे गजू पाटील, आदरणीय शिक्षक सय्यद सर,युवक काँग्रेसचे सचिन पाटील अटकळे,मा.ग्रा.प. सदस्य देविदास मिस्त्री, अफसर भाई, बालाजी तुरुकवाड,संतोष लाळे,उमाकांत मुर्गे, शिवराज सुंके,व मी संतोष कदम ई.जन उपस्थित होतो.