
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
संबंधित विभागचे मात्र दुर्लक्ष
देगलूर:नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अ रस्त्याच्या कामाला किमान चार वर्षे पूर्ण होत आहेत परंतू आणखी या कामाला पुर्णविराम मिळाला नसल्यामुळे अनेकांची स्पप्न भंगले असल्याचे दिसून येत आहे.
नांदेड बिदर या रस्त्यावर दररोज हजारोच्या संख्येने वाहनांची रहदारी असल्यामुळे व शिख धर्मीयांचे देवस्थान याच महामार्गावर असल्यामुळे दररोजची रहदारी, महाराष्ट्र कर्नाटक टान्सपोर्टची वाढती रहदारी व या महामार्गामुळे अनेक प्रवाशांना सोयीचा प्रवास या सर्व गोष्टींचा विचार करून या रस्त्याची वाहवाह करण्यात आली होती परंतू या रस्त्याचा शेवट आणखी निघालाच नाही.
हा रस्ता अपूर्ण झाले असल्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसला आहे. या महामार्गामुळे मुक्रमाबाद बाजारपेठ जवळ झाली असती. हणेगाव येथून मुक्रमाबाद हे पंधरा ते विस मिनिटाचा रस्ता असून या अपूर्णरस्त्यामुळे किमान एक तास लागत आहे. या महामार्गाला शासनाच्या तिजोरीतून करोडो रूपये खर्च झाले असून या रस्त्याला पुर्णत्वास नेण्यास शासन असक्षम दिसत असल्याची चर्चा सुरु आहे.
या राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामासाठी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काम लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. सद्याची परिस्थिती पाहता केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गावर जास्तीची निधी खर्च करत आहे, परंतू याच महामार्गाचे काम का पूर्ण करीत नाहीत याची कुणालाच कल्पना नसल्याचे बोलले जात आहे. नांदेड जिल्ह्याचे खासदार असो, मुखेडचे आमदार असो, की देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार असो यांना या रस्त्याविषयी गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या मतदार संघातील मतदारांना कोणत्या गोष्टीची अडचण आहे याची जाणीव या लोकप्रतिनिधींना माहिती असून सुद्धा नजरअंदाज करीत असल्याची चर्चा सुरू आहे.