
दैनिक चालू वार्ता फुलवळ सर्कल प्रतिनिधी -नवनाथ वाखरडकर
आंबुलगा , ता कंधार, ता.02 जून
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत माणिक प्रभू माध्यमिक विद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन करून आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे . विद्यालयातून परीक्षा दिलेल्या एकुण 157पैकी 153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा एकुण निकाल 97.45 टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह 71 विद्यार्थी प्रथम श्रेणी मधे 70 उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम.. प्रज्ञाताई प्रभाकर व्यव्हारे.-93.80%
निकीता नागनाथ गिते-92.60% पूजा शंकर वडजे- 92%
प्रगती दिगांबर गायकवाड-91.80
राधिका राजू पंदेवाड-91.40%
गुणासह उत्तीर्ण झाले आहेत
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा.जि.प .सदस्य श्री .मनोहरराव बापुराव पा .तेलंग , श्री डॉ. श्याम बापुराव पा. तेलंग, बालाजीराव पा .वडजे ,कर्मवीर इंग्लिश स्कूलचे संचालक प्रा .डॉ .सुरेश तेलंग , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस .एम .गिरे पर्यवेक्षक श्री एस .आर मुंजेवार सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.